एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनुप ठाकरे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
साप्ताहिक सागर आदित्य :
कारंजा लाड :
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनुप ठाकरे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
अनुप ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित आंदोलन कर्ते कर्मच्याऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या रास्त असुन यावर शासनाने त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी केली. कर्मचाऱ्यांचे विलगीकरण व ईतर मागण्या रास्त आहेत. त्यामुळे शासनाने कर्मचारी वर्गाचा सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सदर आंदोलनात आपण कर्मचारी वर्गाच्या बाजूने असून यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच आदोलक कर्मचाऱ्यांना अल्पोपहारास केळी देण्यात आली यावेळी आंदोलनकर्ते कर्मचारी व अनुप ठाकरे , अरविंद भगत, नितीन तायडे, अनिल काटोले,मनिष राठोड, राहुल ठाकरे, अमोल घाने,निलम राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनुप ठाकरे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला."
Post a Comment