-->

 ११ क्विटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

११ क्विटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त



साप्ताहिक सागर आदित्य
 

वाशिम:-दिनांक १८/१०/२०२१ रोजी मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार हिंगोली ते रिसोड रोडने पो स्टे रिसोड जि.वाशीम यांचे हदीतुन आयशर ट्रक मध्ये गांज्याची वाहतुक होत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर बाब पोलीस निरीक्षक  सारंग नवलकार रिसोड यांनी मा. पोलीस अधिक्षक साहेब वाशीम यांचे निदर्शनास

मा. पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली एक पथक हिंगोली ते रिसोड रोड येथे नेमुन सापळा रचनात आला.सापळा रचुन वाहन आयशर टक कमांक एम एच २८ बिबि.०८६७ याची झडती घेतली असता त्यामध्ये अवैध्यरित्या गांज्याची वाहतुक करतांना चार इसम मिळुन आले त्यांची नाव गाव १) गोटीराम गुरदयाल साबळे वय ५२ वर्ष रा.कुन्हा ता.मोताळ जि.बुलढाणा २)सिध्दार्थ भिकाजी गवांदे रा.निमगाव ता.नांदुरा जि बुलढाणा ३)प्रविण सुपडा चव्हाण
राहनवतखेड ता.मोताळा जि.बुलढाणा ४)संदिप सुपडा चव्हाण रा.हनवतखेड ता.मोताळा जि.बुलढाणा असे सांगीतले.सदर आयशर ट्रक मधुन ११ क्विंटल ५० किलो गांजा कीमत ३ कोटी ४५ लाख रुपये व आयशर टक वाहन कीमत २० लाख रुपये असा एकुण ३ कोटी ६५ लाख रुपयाचा माल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही मध्ये मा.पोलीस अधिक्षक बच्चनसिंह अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी  यशवंत केडगे रिसोड ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार,पोलीस उपनिरीक्षक संतोष
नेमणार,शिल्पा सुरगडे ,पोहवा अनिल कातडे,पोना दिपक रंजवे,भागवत कष्टे,सुनिल इंगळे,गुरुदेव वानखेडे यांनी सहभाग नोंदविला आहे.






दिवाळी बंपर ऑफर... 
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल 
Exchange Offer Available...





0 Response to " ११ क्विटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article