राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क
साप्ताहिक सागर आदित्य
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क
फोर्स मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी चेतना कॉलेज, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना व अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. #भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था आणि इतर घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय #कोकण विभागासाठी konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील.
टास्क फोर्सने यापूर्वी पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी नाशिक येथेही संवाद आयोजित करण्यात आला आहे.
#नाशिक विभागासाठी nashike-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर अभिप्राय देता येईल.
विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.
0 Response to "राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क "
Post a Comment