-->

गणेशोत्सवातून साक्षरतेचा जागर… नवभारताचा संकल्प!   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू खुर्द चा नाविन्यपूर्ण उपक्रम

गणेशोत्सवातून साक्षरतेचा जागर… नवभारताचा संकल्प! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू खुर्द चा नाविन्यपूर्ण उपक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

 गणेशोत्सवातून साक्षरतेचा जागर… नवभारताचा संकल्प! 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू खुर्द चा नाविन्यपूर्ण उपक्रम


“उत्सव केवळ आनंदाचा नसतो… तो समाजजागृतीचा आणि परिवर्तनाचा उत्सवही असतो!” 

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी वाशिम तालुक्यातील अनसिंग केंद्रामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू खुर्द येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या पावन पर्वाचा अत्यंत सुंदर आणि विधायक उपयोग केला.

 गणेश मंडळाला भेट देत ‘नवभारत साक्षरता अभियान’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देऊन समाजामध्ये साक्षरतेचा संदेश पोहोचविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर संदेशफलक घेऊन “साक्षर भारत – सक्षम भारत” या विचाराचा प्रसार केला.

या उपक्रमामागे मुख्याध्यापक श्री.सुरज शृंगारे सर, शिक्षक 

 किशोर दाभाडे सर तसेच विद्यार्थ्यांची मेहनत, उत्साह आणि सामाजिक बांधिलकी विशेष कौतुकास्पद आहे. 

या उपक्रमाला केंद्र समन्वयक श्री. संभाजी साळसुंदर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 शाळा म्हणजे केवळ वर्गखोली नाही…

शाळा म्हणजे समाजपरिवर्तनाचे केंद्र!

गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारे आणि समाजाला शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडणारे असे उपक्रमच “साक्षर भारत – सक्षम भारत – नवभारत” घडविण्यास हातभार लावतात. 

 शेलू खुर्दच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना मनःपूर्वक अभिनंदन! 

“एक दिवा ज्ञानाचा…

एक संकल्प साक्षरतेचा…

आणि एक पाऊल नवभारताच्या निर्मितीकडे!” 


संभाजी साळसुंदर ,केंद्र समन्वयक समूह साधन केंद्र, अनसिंग

0 Response to "गणेशोत्सवातून साक्षरतेचा जागर… नवभारताचा संकल्प! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू खुर्द चा नाविन्यपूर्ण उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article