-->

गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो

गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो



साप्ताहिक सागर आदित्य 

 गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो-प्राचार्या मंजुषा सु.देशमुख.             

   रिसोड तालुक्यातील एकमेव भारत माध्यमिक विद्यालय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या हर्शोउल्हासात गुरुपौर्णिमा साजरी करत असताना. इयत्ता पाचवी ते बारावी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे एक आगळ्यावेगळ्या नियोजन केले असता. प्रथमतः प्राचार्या, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे व्यास पिठाकडे आगमन होत असताना प्रत्येकाला सन्मानपूर्वक गुच्छ देत टाळ्याच्या गजरात दोन्ही बाजूंनी विद्यार्थिनी नी आदरपूर्वक सन्मान करत व्यासपीठावर वीराजमान केले. त्यानंतर प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागत गीत सोफिया शेख  या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वरात गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी नखवाल मॅडम यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनीनी गुरु बद्दल आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये स्नेहल बाजड , रूपाली मोरे, नंदनी नेव्हल  , ईश्वरी खोडे, ईश्वरी भोपाळे, प्राजक्ता भोसले, आशीफा शेख, ज्ञानेश्वरी काळे, वैष्णवी सरदार, आरती बिल्लारी , शितल पवार तसेच गीत गायनामध्ये समृद्धी गव्हाणे, अंकिता डव्हळे , आरती गायकवाड यांनी हृदयस्पर्शी गीत सादर केले. विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले.          तसेच शिक्षकांमध्ये प्रा. अभिषेक  टिकाईत सर यांनी मार्गदर्शन करताना जुन्या विद्यार्थी दशेतील आठवणींना  उजाळा देत मजेशीर किस्से सांगितले. त्यानंतर प्रा.साधना बोरकर मॅडम यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे पवित्र नात कशे असते आणि या नात्याला तडा जाता कामा नये असे  भावस्पर्शी उदगार आपल्या विचारातून व्यक्त केले. त्यानंतर भाग्यश्री बेळकुंडे मॅडम व रजनी नखवाल मॅडम यांनी सुमधुर स्वरात गीत गायन केले असता उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. प्रमुख अतिथी आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरु शिष्यांची परंपरा ही अगदी अनादीकालापासून सुरू आहे. आजही ते नाते कसे पवित्र आहे व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपले सर्वस्व कशे अर्पण करतात. असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शेवटी   समारोपातून प्राचार्या मंजुषा सु .देशमुख मॅडम यांनी विचार व्यक्त करताना शिक्षक हा विद्यार्थ्यांचा जीवनाचा कसा शिल्पकार असतो. हे उत्कृष्ट शिल्प तो कसा घडवतो. जन्मदात्या पेक्षाही मार्गदाता कसा श्रेष्ठ असतो. असे मार्गदर्शनपर विचार आपल्या अध्यक्षीय समारोपिय भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाची संपूर्ण आयोजन इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थिनीनी केले. प्रत्येक शिक्षकाचा पुष्पगुच्छ,पेन, शुभेच्छा संदेश पर ग्रेटिंग कार्ड, आणि औक्षण केलें. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. तृप्ती सदार हिने केले. व आभार प्रदर्शन खुशी खडसे या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थिनीनी उत्कृष्ट नियोजनाबरोबर एक आदर्श निर्माण केला. शेवटी कार्यक्रमाची सांगता संपूर्ण विद्यार्थिनींना खाऊ वाटपाने करण्यात आली.

0 Response to "गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article