-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.

 वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  प्रसेन भगत सर होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक कु. शिल्पा घुकसे मॅडम,  खंडारे सर, राष्ट्रीय हरित सेना शिक्षक राठोड सर, उजवे सर तसेच शाळेतील  वानखडे सर,  मोसिन सर,  पारधी सर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मतही व्यक्त करण्यात आले.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article