मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
एल निनो च्या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा
मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात #जलयुक्तशिवारअभियान २.०, अमृत सरोवर, माजी मालगुजारी तलावांचे बळकटीकरण कार्यक्रम, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत १५.जून २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. प्रत्येक कामाचे मूल्यमापन करावे. जलयुक्त शिवार अभियान २.० बाहेरील गावांपैकी अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झालेल्या व पुनर्भरण क्षमता अधिक असलेल्या कामांची दुरुस्ती उपलब्ध शासन निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री राठोड दिल्या.
बैठकीला मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 Response to "मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा "
Post a Comment