अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींची वेळेवर माहिती मिळाल्यास
साप्ताहिक सागर आदित्य
'सचेत (SACHET)' ॲपद्वारे मिळणार आपत्तीपूर्व सूचना
नागरिकांनी तात्काळ डाउनलोड करावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम, : अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींची वेळेवर माहिती मिळाल्यास जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. याच उद्देशाने
National Disaster Management Authority (NDMA), भारत सरकार यांनी 'सचेत (SACHET)' ॲप विकसित केले आहे.
या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना विविध नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वसूचना (Early Warning Alerts) थेट मोबाईलवर प्राप्त होतात. GPS आधारित असलेल्या या ॲपद्वारे वापरकर्त्याच्या स्थानानुसार संबंधित परिसरातील संभाव्य आपत्तींची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
ॲप डाउनलोड करण्याची प्रक्रिया
* मोबाईलमधील Google Play Store उघडा.
* सर्च बारमध्ये "SACHET NDMA App" असे टाइप करा.
* NDMA/भारत सरकारचे अधिकृत ॲप निवडा.
* Install बटणावर क्लिक करा.
* ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडा.
* मोबाईलचे Location (GPS) सुरू करा.
* आवश्यक परवानग्या (Permissions) मंजूर करा.
* वेळेवर सूचना मिळण्यासाठी Notifications सुरू ठेवा.
प्रशासनाचे आवाहन
सर्व नागरिकांनी 'सचेत (SACHET)' ॲप तात्काळ डाउनलोड करून वापरात आणावे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आपदा मित्र/सखी, ग्रामपंचायत डेटा एन्ट्री ऑपरेटर, सरपंच आणि पोलिस पाटील यांनी गावस्तरावर या ॲपची व्यापक जनजागृती करावी.
आपत्तीपूर्व सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीचाच आधार घ्यावा.
'सचेत' ॲप नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त साधन असून आपत्तीच्या काळात सतर्क राहण्यासाठी ते प्रभावी ठरते. गावातील सर्व स्थानिक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसूचना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून संभाव्य जीवितहानी टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
0 Response to "अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींची वेळेवर माहिती मिळाल्यास "
Post a Comment