राज्यातील बियाणे उद्योगासमोरील विविध अडचणी बाबत कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक
साप्ताहिक सागर आदित्य
राज्यातील बियाणे उद्योगासमोरील विविध अडचणी बाबत कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक
पार पडली. राज्यातील बियाणे उद्योगासमोरील विविध अडचणी, शासनाच्या नियमांबाबत उद्योग क्षेत्राच्या मागण्या तसेच #बियाणे उत्पादन, वितरण आणि गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत, असे यावेळी कृषि मंत्री भरणे यांनी सांगितले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, बियाणे नमुना तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. बियाणे उत्पादन, गुणवत्ता आणि पुरवठा साखळीत सुधारणा घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘साथी’ पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी करावी. जालना येथे प्रस्तावित सीड पार्कसाठी ७५ एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात आली असून #महाबीज, अकोला यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपलब्ध भूखंडांचे वाटप करण्यासाठी निकष निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्यात येणार आहे. स्थानिक उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल.
मंत्रालयात आयोजित बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक सुनिल बोरकर बियाणे उद्योगाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Response to "राज्यातील बियाणे उद्योगासमोरील विविध अडचणी बाबत कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक "
Post a Comment