-->

जिल्हा परिषदेची अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत

जिल्हा परिषदेची अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत



साप्ताहिक सागर आदित्य 

 जिल्हा परिषदेची अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत


वाशिम, : जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत अनुकंपा नियुक्तीधारक उमेदवारांची जून २०२६ अखेरची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यादीबाबत संबंधित उमेदवारांना काही आक्षेप अथवा हरकती असल्यास त्यांनी आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह हस्तलिखित स्वरूपात सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद वाशिम येथे सादर कराव्यात.

निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली यादी काळजीपूर्वक तपासून आवश्यक असल्यास विहित कालावधीत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा परिषद वाशिमच्या अधिकृत संकेतस्थळ zpwashim.gov.in ला भेट द्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हा परिषद वाशिम यांनी कळविले आहे.

0 Response to "जिल्हा परिषदेची अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article