-->

गौतम दिलीप सुर्वे यांची आझाद समाज पार्टीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी निवड ....

गौतम दिलीप सुर्वे यांची आझाद समाज पार्टीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी निवड ....



 साप्ताहिक सागर आदित्य 

गौतम दिलीप सुर्वे यांची आझाद समाज पार्टीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी निवड ....  

आयुष्यमान गौतम दिलीप सुर्वे यांची नुकतीच आझाद समाज  पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून यावेळी आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते .वाशिम आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक बांधणी मोठ्या जोमाने सुरू असून. त्याचाच एक भाग  सर्किट हाऊस वाशिम येथे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तथा आजाद समाज पार्टीचे विदर्भ अध्यक्ष उमेश भाऊ हिवराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पार पडलेल्या बैठकीत आझाद समाज पार्टीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील तरुण तडफदार युवा नेता तथा सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान गौतम भाऊ दिलीप सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .यावेळी गौतम भाऊ सुर्वे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . व पक्षाची धुरा आणि जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली.या बैठकीला प्रामुख्याने राम प्रभू सोनवणे ,जावेद पठाण, संजय शिंदे ,संजय पडघान, दादाराव घुगे ,संविधान ढोले ,पंजाब कांबळे ,दयाराम खाडे ,भीमराव भगत ,केशव उचित ,राजू तायडे ,प्रकाश पट्टेबहादूर ,दिलीप सरकटे, विजय इंगोले यांच्यासह बहुसंख्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गौतम भाऊ सुर्वे यांच्या निवडीमुळे मालेगाव तालुक्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून. त्यांची सर्वत्र स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

0 Response to "गौतम दिलीप सुर्वे यांची आझाद समाज पार्टीच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी निवड .... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article