जिल्ह्याला पोहोचला ४ लाख २९ हजार लिटर इंधन साठा
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्याला पोहोचला ४ लाख २९ हजार लिटर इंधन साठा
वाशिम,दि.२९ मे दि. २८ मे २०२६ रोजी जिल्ह्याला विविध तेल कंपन्यांकडून एकूण ४ लाख २९ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. यामध्ये १ लाख ४३ हजार लिटर पेट्रोल व २ लाख ८६ हजार लिटर डिझेलचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) कंपनीकडून ५८ हजार लिटर पेट्रोल व १ लाख ७८ हजार लिटर डिझेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीकडून १३ हजार लिटर पेट्रोल व ५१ हजार लिटर डिझेल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कंपनीकडून १९ हजार लिटर पेट्रोल व १० हजार लिटर डिझेल, जिओ-बिपी कंपनीकडून २४ हजार लिटर पेट्रोल व १८ हजार लिटर डिझेल तसेच नायरा एनर्जी कंपनीकडून २९ हजार लिटर पेट्रोल व २९ हजार लिटर डिझेल असा इंधन साठा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
जिल्हा प्रशासन सर्व तेल कंपन्यांच्या सतत संपर्कात असून पुढील काळातही दररोज इंधन साठा जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध असून इंधन वितरण सुरळीत सुरू आहे.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अतिरिक्त स्वरूपात पेट्रोल व डिझेल खरेदी करू नये. आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करून पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ (Essential Commodities Act, 1955) मधील कलम ३ व ७ अन्वये विहित मर्यादेपेक्षा जास्त इंधन साठा करणे, साठेबाजी करणे अथवा नफेखोरी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे. इंधनाचा अतिरिक्त अथवा अनधिकृत साठा करणारे नागरिक, व्यापारी तसेच पेट्रोल पंप चालक-मालक यांच्यावर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
0 Response to "जिल्ह्याला पोहोचला ४ लाख २९ हजार लिटर इंधन साठा"
Post a Comment