-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्षउल्हासात साजरी.....

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्षउल्हासात साजरी.....



साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्षउल्हासात साजरी..... 

 भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे विश्वरत्न बोधीसत्व प्रज्ञासूर्य क्रांतीसुर्य जागतिक दर्जाचे कायदेतज्ञ उच्च विद्याविभूषित प्रकांड पंडित कामगारांचे लढवय्यें स्त्रियांचे उद्धारकरते शेतकऱ्याची कैवारी आर्थिक धोरणाचे धुरंधर जलक्रांतीचे प्रणेते अखंड ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत ज्ञानाच्या अथांग भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न विश्ववंदनीय भारतरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या135 व्या  जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या  सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम पर्यवेक्षक  सुनील डहाळके सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि कृतीला कोटी कोटी वंदन. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना ना विमान, ना हेलिकॉप्टर, ना हातात व्हाट्सॲप, ना सोबतीला मीडिया! तरीही गावकुसाबाहेरील शेवटच्या माणसापर्यंत ज्यांचा शब्द पोहोचला आणि ज्यांच्या शब्दाखातर हजारो वर्षांची गुलामगिरी झुगारून समाज ताठ मानेने उभा राहिला, अशा 'टाईम मॅनेजमेंट'च्या पलीकडील महामानवाची आज जयंती! केवळ ६५ वर्षांचे आयुष्य... त्यातली ३० वर्षे शिक्षणात गेली, त्यामध्ये 32 संपादन करत उरलेल्या अवघ्या २५-३० वर्षांत त्यांनी २३ ग्रंथ लिहिले, वृत्तपत्रे चालवली, सत्याग्रह केले आणि या देशाला संविधान दिले. आज सगळी साधने असूनही आपण जिथे पोहोचू शकत नाही, तिथे बाबासाहेब आपल्या विचारांनी आणि कतृत्वाने काळजापर्यंत पोहोचले. अशा या प्रज्ञासूर्याला, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम केले. त्यानंतर आदरणीय पर्यवेक्षक सुनील डाहळकेसर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलताना बाबासाहेब म्हणजे आधुनिक भारताचे निर्माते आजही आपणाला त्यांचे विचार मार्ग दाखवतात. त्यामध्ये शिका! संघटित व्हा!!  संघर्ष करा!!! हा त्यांचा संदेश आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणा देणार आहे. असे सूचक विधान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुलाब साबळे सर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग मोरे सर यांनी केले. व आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम यांनी  केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्षउल्हासात साजरी..... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article