-->

मंगरूळपीर येथे "माझे गाव- आरोग्य संपन्न गाव"   कार्यशाळा संपन्न

मंगरूळपीर येथे "माझे गाव- आरोग्य संपन्न गाव" कार्यशाळा संपन्न



साप्ताहिक सागर आदित्य 

 मंगरूळपीर येथे "माझे गाव- आरोग्य संपन्न गाव" 

कार्यशाळा संपन्न

 


पंचायत समिती मंगरूळपीर येथे दिनांक 28 एप्रिल रोजी  "माझे गाव- आरोग्य संपन्न गाव" ही कार्यशाळा संपन्न झाली.

 कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी सारिका कारले यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी धनश्री जाधव, पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी मनोज वानखेडे, पंचायत चे विस्ताराधिकारी इम्रान शेख, जिल्हा परिषदेचे राम शृंगारे आणि आरोग्य सेवक दत्ता माहुलकर यांची उपस्थिती होती.

 यावेळी सेवा हमी कायदा दिनानिमित्त सर्व प्रशिक्षणार्थी आणि पंचायत समिती मधील अधिकारी व  कर्मचाऱ्यांना सेवा हमी कायद्याबाबत शपथ देण्यात आली.

 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून तयार करण्यात आलेले स्वच्छ भारत मिशनचे प्रचार साहित्य यांचे प्रतिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. जनुना ग्रामपंचायतचे सरपंच नितेश खडसे यांना माहिती पुस्तिका आणि पोस्टर चे वितरण करण्यात आले. सदर साहित्य प्रत्येक गावामध्ये वितरीत करण्यात येणार असून या माध्यमातून लोकांमध्ये  जागृती करण्याचे आवाहन  गटविकास अधिकारी सारिका कारले यांनी केले. यावेळी गट समन्वयक प्रवीण आखाडे यांची उपस्थिती होती.

0 Response to "मंगरूळपीर येथे "माझे गाव- आरोग्य संपन्न गाव" कार्यशाळा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article