काटा येथे जागतिक आरोग्य दीन निमित्त एचपी व्ही व कायदेविषयक जनजागृती शिबिर
साप्ताहिक सागर आदित्य
काटा येथे जागतिक आरोग्य दीन निमित्त एचपी व्ही व कायदेविषयक जनजागृती शिबिर
एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी विज्ञानाची साथ भविष्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्य नुसार
प्रा.आ. केंद्र काटा येथे एचपी व्ही लसीकरण व आरोग्य विषयक मार्गदर्शन व कायदेविषयक जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी. मा. श्री व्ही.जी. चौखंडे सचिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण वाशिम. मा.श्री डॉ पांडुरंग ठोंबरे सर जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम. मा. अँड श्री डी.डी. गुडदे कोषाध्यक्ष जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम. मा. श्री डॉ.विजय काळे सर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मा.श्री डॉ चाफे सर माता बाल व संगोपन अधिकारी व काटा येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्य सेवा व कायदा या विषयावर जिल्हा विधी सेवा श्री व्ही जी चौखंडे सर यांनी सखोल असे कायदेविषयक मार्गदर्शन केले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ ठोंबरे सर यांनी एचपी व्ही लसीकरण बाबत सखोल असे मार्गदर्शन करून लस घेण्याबाबतचे फायदे समजून सांगितले तसेच लोकांच्या मनामधील गैरसमज दूर करून लस घेण्याचे आव्हान केले. आव्हान करताच काटा येथे 12 मुलींचे एचपी व्ही लसीकरण करण्यात आले. तसे डॉ विजय काळे सर यांनी सुद्धा आरोग्य विषयक मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटा वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल टार्फे व सर्व कर्मचारी वृंद हजर होते.
0 Response to "काटा येथे जागतिक आरोग्य दीन निमित्त एचपी व्ही व कायदेविषयक जनजागृती शिबिर"
Post a Comment