-->

नालंदा नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

नालंदा नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

नालंदा नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्साहात साजरी


नालंदा नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. म. जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नालंदा नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर भंते प्रज्ञापाल जी महाथेरो यांच्या हस्ते त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना बौद्ध धम्माचे मूल्य व आचरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी समितीचे अध्यक्ष सहदेव चंद्रशेखर, उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह रमेश गवई, गजानन आठवले, सुनीता कांबळे, ॲड. नारायण पडघान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर राम शृंगारे व अनिल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले यांच्या ‘अखंडा’चे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन केले.

कार्यक्रमात सोनगव्हाण येथील ज्येष्ठ कलावंत ज्ञानबा श्रावण जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण व प्रभावी भाष्य केले.

 *यानंतर आरतीताई ठोके यांच्या नेतृत्वात  "सोहळा भीम कन्येचा- उत्सव नालंदा नगराचा" हा महिलाचा 'संगीत नृत्य'  हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये नालंदा नगरातील महिलांनी सहभाग घेऊन महापुरुषांच्या गीतांवर तसेच लेझीम पथकाच्या माध्यमातून  नृत्य  सादर केले.*

या कार्यक्रमाला उत्सव समितीचे सचिव तथा नगरसेवक अनिल ताजने, नागसेनपट्टेबहादूर,  ऍड. पि. पि. अंभोरे, एकनाथ धवसे, भिमराव सावळे, डॉ. संजय पडघान, प्रकाश हिवराळे, गणेश हनुमंते, प्रमोद खिल्लारे, राज बलखंडे , मेजर प्रल्हाद सरकटे, गजानन आठवले, लोककवी विलास भालेराव, शाहीर देविदास तायडे, प्रदीप वाकोडे, भगवान ठोके, मधुकर खरात, संजय वानखडे, दिगंबर गुडदे, मेजर काशिनाथ भिसे, अमन अवचार, विशाल नितनवरे, राजू भुसारी, डॉ. मुरलीधर ताजने, काशिनाथ अंभोरे, मेजर वैद्य, भारत पडघान, गुणवंत मुळे, बाळाजी ढोले, धम्मानंद भगत, दौलत कांबळे, भारत खडसे, दत्ता भगत, प्रफुल्ल खिल्लारे, सौरभ गायकवाड, गजानन गवई, बंडू टापरे, प्रदीप चतुर, नायकर खोडके, राजकुमार वाघमारे, बाळू कांबळे, गणेश शेलार, आनंद राणबावळे , आरतीताई ठोके, डॉ. मायाताई हिवाळे, कादंबरीताई पट्टेबहादूर, लक्ष्मीबाई पट्टेबहादूर, वनिताताई तायडे, शीलाताई खिल्लारे, कांचनताई कांबळे, आरतीताई धवसे, संगीताताई आठवले, आशाताई गायकवाड, उज्वलाताई ढोले, संगीताताई गायकवाड, मंदाताई हनुमंते, इरावतीताई अंभोरे, अनिताताई चंद्रशेखर, सुवर्णाताई राऊत, आम्रपालीताई ताजने आदींची उपस्थिती लाभली.

----

0 Response to "नालंदा नगर येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्साहात साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article