-->

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर जिल्हास्तरीय जनगणना कक्षाची स्थापना करण्यात आली

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर जिल्हास्तरीय जनगणना कक्षाची स्थापना करण्यात आली

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हास्तरीय जनगणना कक्ष’ सुरू; प्रक्रियेच्या समन्वयाला गती


जिल्ह्यातील जनगणना प्रक्रियेचे प्रभावी सनियंत्रण व समन्वयन साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर जिल्हास्तरीय जनगणना कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन आज दि.(२६) मार्च रोजी प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या शुभहस्ते पार पडले.


नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामार्फत जिल्ह्यातील जनगणना कामकाजाचे नियोजनबद्ध पद्धतीने निरीक्षण, समन्वय आणि अंमलबजावणी करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेला अधिक गती व पारदर्शकता मिळणार आहे.


या प्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी तथा कारंजा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, तहसीलदार निलेश पळसकर, प्रतिक्षा तेजनकर, जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत, जिल्हा समन्वयक ऋषीकेश पाथरे, शशांक रुखने आदी उपस्थित होते.

0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर जिल्हास्तरीय जनगणना कक्षाची स्थापना करण्यात आली "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article