-->

राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचे लोकार्पण झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला.

राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचे लोकार्पण झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला.



 साप्ताहिक सागर आदित्य 

📍 विधानभवन, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचे लोकार्पण झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर आदी उपस्थित होते.

ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे ३ हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

#राजमाताजिजाऊ #बससेवा

0 Response to "राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचे लोकार्पण झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article