बेघरांना घर मिळावे यासाठी शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. #शासकीयजमीन, #गायरान किंवा गावठाणातील जमीन उपलब्ध असल्यास ती देण्याची तरतूद आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून #घरकुल योजनेचे काम वेगाने सुरु आहे.
राज्यात मागील सात ते आठ महिन्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
बेघरांना घर मिळावे यासाठी शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. #शासकीयजमीन, #गायरान किंवा गावठाणातील जमीन उपलब्ध असल्यास ती देण्याची तरतूद आहे. जमीन उपलब्ध नसल्यास जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
#प्रधानमंत्रीआवासयोजना
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
#बेघर आणि #भूमीहीन कुटुंबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार #छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातील ७,८१७ भूमीहीन लाभार्थ्यांना विविध योजनांद्वारे जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. उर्वरित ४,३८५ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत #संगणक परिचालकांना वेळेत मानधन मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याबाबत योग्य यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
दिले जाणारे मानधन हे थेट शासनाकडून न देता ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. या पार्श्वभूमीवर मानधन वेळेत मिळावे, यासाठी आवश्यक सुधारणा आणि कार्यपद्धतीत बदल करण्याचा शासनस्तरावर विचार सुरू आहे. मानधन शासनाने टप्प्याटप्प्याने वाढवले असून सध्या त्यांना प्रतिमाह १० हजार रुपये मानधन दिले जाते.
#परिचालक
प्रश्नोत्तरांसंदर्भात सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/193870/
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
0 Response to "बेघरांना घर मिळावे यासाठी शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. #शासकीयजमीन, #गायरान किंवा गावठाणातील जमीन उपलब्ध असल्यास ती देण्याची तरतूद आहे. "
Post a Comment