जिल्हाधिकारी कार्यालयात २ फेब्रुवारीला लोकशाहीदिन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी कार्यालयात २ फेब्रुवारीला लोकशाहीदिन
वाशिम, : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात करण्यात आले आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीसह जोडलेले अर्ज सादर करावे.
महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.
0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालयात २ फेब्रुवारीला लोकशाहीदिन"
Post a Comment