जि.प.उच्च प्राथ. शाळा, राजुरा राव येथील विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद
साप्ताहिक सागर आदित्य
जि.प.उच्च प्राथ. शाळा, राजुरा राव येथील विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत जि. प.उच्च प्राथ शाळा, राजुरा राव शाळेची शैक्षणिक सहल विविध भौगोलिक, ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र इत्यादी ठिकाणी भेट देऊन
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक,भौगोलिक,तीर्थक्षेत्र इत्यादी स्थळांची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान याचा लाभ व्हावा तसेच सामाजिक जाणीव व पुढील आयुष्यात उपयोग व्हावा हे या सहलीमागील उद्दिष्ट होते. सहलीमध्ये देवगड,नेवासा, शनिशिंगणापूर, सोनई रेणुका माता देवी,पैठण नाथसागर व बगीचा,भद्रा मारुती,वेरूळ लेण्या, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबाद किल्ला,सिद्धार्थ गार्डन इत्यादी स्थळांचा समावेश होता. शेवटी 12 जानेवारीच्या सकाळी चिमूकल्या मावळ्यांनी राष्ट्रमाता,राजमाता माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्त नतमस्तक होऊन मानाचा मुजरा केला आणि सहलीचा समारोप करण्यात झाला.
शैक्षणिक सहलीचे आयोजन मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.शैक्षणिक सहलीत एकूण शाळेतील 44 विद्यार्थी व पाच शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी शिक्षक महादेव ठाकरे, संजीव डिघोळे, छाया डिघोळे,गणेश धोंगडे,नरेंद्र उगले, देवीसिंग पडवाल इत्यादी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदीप क्षीरसागर, उपाध्यक्ष रमेश सानप, सदस्य प्रवीणभाऊ सोनोने व सर्व सदस्यांचे खूप सहकार्य लाभले.
0 Response to "जि.प.उच्च प्राथ. शाळा, राजुरा राव येथील विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद"
Post a Comment