विशेष मोजणी मोहिमेतून जिल्ह्यातील ५३ मोजणी प्रकरणांचा एका दिवसात निपटारा
साप्ताहिक सागर आदित्य
विशेष मोजणी मोहिमेतून जिल्ह्यातील ५३ मोजणी प्रकरणांचा एका दिवसात निपटारा
वाशिम,
जिल्ह्यातील ९० दिवसांपेक्षा प्रलंबित असलेली एकूण ५३ मोजणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोजणी मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.
ही मोहिम उप अधीक्षक भूमि अभिलेख वाशिम, मंगरुळपिर, कारंजा, रिसोड व मानोरा या कार्यालयांमार्फत दि. २४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. मोहिमेमध्ये एकूण ५३ मोजणी कर्मचारी सहभागी झाले असून २४ रोव्हर मशीनचा प्रभावी वापर करण्यात आला.
मोहिमेसाठी दोन मोजणी कर्मचारी यांची एक टीम तयार करून प्रत्येक टीमला एक रोव्हर मशीन देण्यात आले. प्रत्येक टीमला लगतच्या गावांतील दोन मोजणी प्रकरणे मोजणी कामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आली होती.
या विशेष मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती शिल्पा सानप यांनी जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख यांची प्रत्यक्ष बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. तसेच दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दि. २४ जानेवारी २०२६ रोजी ज्या प्रकरणांमध्ये मोजणी करण्यात आली, त्या सर्व प्रकरणांमध्ये त्याच दिवशी हद्द कायम करण्याच्या सूचना संबंधित मोजणी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. या विशेष मोजणी मोहिमेत एकूण ५३ मोजणी प्रकरणांची मोजणी कार्यवाही पूर्ण करून सर्व प्रकरणे त्याच दिवशी निकाली काढण्यात आली.
यासाठी भूमी अभिलेखच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
0 Response to "विशेष मोजणी मोहिमेतून जिल्ह्यातील ५३ मोजणी प्रकरणांचा एका दिवसात निपटारा"
Post a Comment