-->

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक



साप्ताहिक सागर आदित्य 

 जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक     

         जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


जनगणना बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक 


वाशिम ,   जनगणना कामासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. 


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, नगरपालिका मुख्याधिकारी निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.


पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले,सन २०२७ मध्ये होणारी राष्ट्रीय जनगणना ही पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय पोर्टल कार्यान्वित राहणार आहे.


अचूक लोकसंख्येची आकडेवारी प्राप्त होण्यासाठी जनगणना प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गट नियोजन, पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या नियुक्तीबाबत योग्य नियोजन करावे. तसेच जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद सखोलपणे समजून घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.


सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेच्या प्रशासकीय तयारीला प्रारंभ झाला असून, त्याअनुषंगाने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन  करावे. या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि परिपत्रकाचे अवलोकन करून योग्य ती तयारी करून ठेवावी. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय अथवा निष्काळजीपणा चालणार नाही. त्यामुळे जनगणना कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण व आढावा बैठकीस उपस्थित राहून प्रत्यक्ष सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सूचित केले.


 तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगररचना कार्यालयातील अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


0 Response to "जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article