‘यंत्रणेची झाली पूर्ण तयारी, मतदार राजा आता तुझी जबाबदारी’ प्रशासकीय यंत्रणा सज्ज दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा ९६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ९२८ पोलिस बंदोबस्तात
साप्ताहिक सागर आदित्य
‘यंत्रणेची झाली पूर्ण तयारी, मतदार राजा आता तुझी जबाबदारी’
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
९६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
९२८ पोलिस बंदोबस्तात
लोकशाहीचे सामर्थ्य मतात — प्रत्येकाने मतदान करावे
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या ३ नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडणार असून मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वयंसेवकांची मदत, शौचालये तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्प उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असून पाच व्यक्तींपेक्षा अधिक जमावास मनाई करण्यात आली आहे.
मतदारांना मतदान केंद्राची माहिती https://mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर नाव किंवा EPIC क्रमांकाद्वारे मिळू शकते तसेच ‘मताधिकार’ या अॅपमध्येही माहिती उपलब्ध आहे. निवडणूक कामकाजासाठी रिसोड २१ आणि कारंजा ३६ , मंगरूळपीर १० व मालेगाव २० अशी मिळून एकूण ८७ शासकीय व खाजगी वाहने अधिग्रहित करण्यात आलेली आहेत.
'वोटर आयडी' सह १२ पुरावे ग्राह्य
मतदानासाठी पासपोर्ट, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, सरकारी ओळखपत्र, बँक पासबुक, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, पेन्शन कार्ड, खासदार-आमदार ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र आणि विमा कार्ड इत्यादी ओळखपत्रे ग्राह्य धरली जातील.
नगरपरिषद निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धत लागू असून एका मतदाराने एकूण तीन मते देणे अपेक्षित आहे. एक मत अध्यक्षपदासाठी तर दोन मते सदस्यपदांसाठी द्यावी लागेल. अध्यक्षपदासाठीची मतपत्रिका फिका गुलाबी तर सदस्यपदांसाठीच्या मतपत्रिका अनुक्रमे पांढरा (‘अ’), फिका निळा (‘ब') रंगात ('क') फिका पिवळा जागेसाठी असतील. नगरपंचायतीत एकसदस्यीय पद्धतीने एका मतदाराने दोन मते — एक अध्यक्ष व एक सदस्य — देणे मतदारांना बंधनकारक आहे.
शांततेत मतदान पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात असून रिसोड नगर परिषद क्षेत्रात उपअधीक्षक १, निरीक्षक २, उपनिरीक्षक ९, पुरुष अंमलदार ८२, महिला १५ आणि होमगार्ड पुरुष ७६ व महिला २४ यांची नियुक्ती आहे. मालेगाव नगरपंचायतीत उपअधीक्षक १, निरीक्षक १, उपनिरीक्षक ७, अंमलदार पुरुष ७४, महिला ११, होमगार्ड पुरुष ५६, महिला २४; मंगरूळपीर नगरपरिषदेत उपअधीक्षक १, निरीक्षक २, उपनिरीक्षक ६, अंमलदार पुरुष ८१, महिला १५, होमगार्ड पुरुष ६३, महिला २४ आणि कारंजा नगरपरिषदेत उपअधीक्षक १, निरीक्षक २, उपनिरीक्षक ११, अंमलदार पुरुष १४९, महिला २१, होमगार्ड पुरुष १४५ व महिला २४ इतका बंदोबस्त तैनात आहे.
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्य शासनाने मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी वाशिम जिल्ह्यातील , रिसोड, कारंजा, मंगरूळपीर नगर परिषद व मालेगाव नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लागू केली.अशी अधिसूचना दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आली आहे.तसे कामगारांना देखील भरपगारी सुट्टी मतदानासाठी मिळणार आहे.
मालेगाव नगरपंचायतीत एकूण मतदार १९ हजार १६९ तर रिसोड नगरपरिषदेत २९ हजार ९६२ आहेत. मंगरूळपीरमध्ये २९ हजार ११९ आणि कारंजा नगरपरिषदेत ७० हजार ३३१ मतदार नोंदणीकृत आहेत. एकूण मनुष्यबळात कारंजा ५०५, मंगरूळपीर १६८, मालेगाव १२० आणि रिसोड १६८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
एकूण मतदार,मतदान केंद्रे
मालेगाव नगरपंचायत एकूण मतदार १९ हजार १६९ महिला ९ हजार ४९४ , पुरुष ९ हजार ६७५, मतदान केंद्र २४ , इमारती ९, प्रभाग १७, अध्यक्षपदासाठी उमेदवार ५, सदस्य पदासाठी उमेदवार ६६
रिसोड नगरपरिषद एकूण मतदार २९ हजार ९६२ महिला १४ हजार ६८३ पुरुष १५ हजार २७९, मतदान केंद्र ३६, इमारती ११, प्रभाग ९, अध्यक्ष पदासाठी उमेदवार ५, सदस्य पदासाठी उमेदवार ९७
मंगरूळपीर नगरपरिषद एकूण मतदार २९ हजार ११९ महिला १४ हजार ४५३ पुरुष १४ हजार ६६६ मतदान केंद्र 31, प्रभाग १०, इमारती १३, अध्यक्ष पदासाठी उमेदवार ५, सदस्य पदासाठी उमेदवार ८६
कारंजा नगरपरिषद एकूण मतदार ७० हजार ३३१ महिला ३४ हजार ९३१, पुरुष ३५ हजार ३९६ मतदान केंद्र ८८, इमारती ३८, प्रभाग १५, अध्यक्ष पदासाठी उमेदवार १२, सदस्य पदासाठी १२८
महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात सखी मतदान केंद्रे, युवकांसाठी युवा मतदान केंद्रे आणि विशेष दिव्यांग मतदान केंद्रे सुरू राहतील.जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे थेट नियंत्रण केले जाईल.
मतदान शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज असून मतदारांनी उत्साहाने मतदान करून लोकशाही बळकट करावी.जिल्ह्यात ‘स्वीप अभियानांतर्गत मतदार जागृतीसाठी राबविलेल्या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.विशेषत: महिला व दिव्यांग मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे.
_योगेश कुंभेजकर ,
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम
0 Response to "‘यंत्रणेची झाली पूर्ण तयारी, मतदार राजा आता तुझी जबाबदारी’ प्रशासकीय यंत्रणा सज्ज दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा ९६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ९२८ पोलिस बंदोबस्तात"
Post a Comment