मतदान व मतमोजणीच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची कारंजा व मंगरूळपीर येथे भेट
साप्ताहिक सागर आदित्य
मतदान व मतमोजणीच्या तयारीची पाहणी
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची कारंजा व मंगरूळपीर येथे भेट
वाशिम,
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दि.१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कारंजा येथील शेतकरी निवास भवन तसेच मंगरूळपीर येथील पीएमश्री जि.प.माजी शासकीय शाळेतील मतदान केंद्र आणि तहसील कार्यालय मंगरूळपीर येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक तयारीची सविस्तर पाहणी केली.
मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा बंदोबस्त, मतदान साहित्याची उपलब्धता, मतमोजणी कक्षांची रचना, प्रवेश-निर्गमन व्यवस्था, वाहनतळ व नियंत्रण कक्ष, व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तपासणी त्यांनी केली. यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल डीपॉझीटची व्यवस्था करण्यात यावी, अशी महत्त्वाची सूचना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.
ते यावेळी म्हणाले, मतदारांना कोणताही त्रास होऊ नये व निवडणूक शांततेत आणि सुयोजित पद्धतीने पूर्ण व्हावी, हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे.
कारंजा पाहणीदरम्यान
उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी,तहसीलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी महेंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते.
तर मंगरूळपीर येथील पी.एम.श्री माजी शासकीय जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्र व तहसील कार्यालय पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी क्षीरसागर उपजिल्हाधिकारी दीपक बाजड,तहसीलदार सुधाकर अनासुने, नायब तहसीलदार रवि राठोड तसेच निवडणूक विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.यावेळी श्री.कुंभेजकर यांनी मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सविस्तर निर्देश यंत्रणांना दिले.
दोन्ही ठिकाणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदान व मतमोजणीच्या सर्व प्रकारच्या नियोजनाची माहिती दिली.
0 Response to "मतदान व मतमोजणीच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची कारंजा व मंगरूळपीर येथे भेट"
Post a Comment