-->

डॉक्टर जीवन वाचवणारे, वेदना कमी करणारे आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करणारे मानवतेचे सेवक आहेत.

डॉक्टर जीवन वाचवणारे, वेदना कमी करणारे आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करणारे मानवतेचे सेवक आहेत.



साप्ताहिक सागर आदित्य 

सेवाभाव आणि नीतिमूल्यांनी डॉक्टर घडावेत

      जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 


विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी संदेश


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’ येथे नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचा व्हाईट कोट समारंभ उत्साहात 



डॉक्टर जीवन वाचवणारे, वेदना कमी करणारे आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करणारे मानवतेचे सेवक आहेत. एका रुग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्याची ताकद त्यांच्या हातात असते म्हणूनच समाज डॉक्टरांकडे अढळ विश्वासाने पाहतो. ज्ञान, कौशल्य आणि संवेदनशीलता यांची सांगड घालूनच एक उत्कृष्ट डॉक्टर घडतो. रुग्णाचे दु:ख समजून घेणे, त्याला धीर देणे आणि प्रत्येक टप्प्यावर सोबत उभे राहणे हीच त्यांच्या सेवाभावाची खरी ओळख आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम येथे नव्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट सेरेमनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व औचित्यपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर बोलत होते.


पुढे बोलतांना, जिल्हाधिकारी  यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचा प्रेरणादायी संदेश दिला. वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेची मोठी संधी आहे.असे सांगून त्यांनी सेवाभाव, मानवतावादी दृष्टिकोन आणि शिस्त या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

डॉक्टर आरोग्य-जागृतीचे दूत म्हणून निरोगी जीवनशैली, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा समाजापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या एका योग्य निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब वाचू शकते आणि एका सल्ल्यामुळे भविष्यातील आजार टाळता येतो. वैद्यकीय सेवा हे एक पवित्र व्रत आहे.निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा शुद्ध संगम होय.

एक नवी जबाबदारी, नवी प्रतिज्ञा आणि समाजाप्रतीची नवी वचनबद्धता आहे. असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.


यावेळी डॉ. सतीश देव पुजारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, डॉ. पुरी, डॉ. झरे, डॉ. खाकसे, आणि डॉ. हरीष बाहेती, अधिष्ठाता डॉ.सतिन मेश्राम ,उपअधिष्ठाता डॉ.धरमसिंग पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश मेश्राम यांनी करून व्हाईट कोटच्या मूल्याचे महत्त्व स्पष्ट केले.व्हाईट कोट हा केवळ श्वेत कपडा नाही, त्यामागे उच्च नैतिक मूल्ये, निष्ठा आणि रुग्णाप्रती आदराची भावना दडलेली आहे.

वैद्यकीय क्षेत्र हा सेवा आणि विज्ञानाचा अद्भुत संगम आहे.  एका डॉक्टरला ज्ञानासोबत कौशल्यही असणे आवश्यक आहे, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मनात सहानुभूती, नम्रता आणि नीतिमत्ता ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


डॉ. सतीश देव पुजारी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत  मार्गदर्शन केले .ते म्हणाले,

“विद्या विनयेन शोभते” या ब्रीदवाक्यानुसार ज्ञानाला नम्रतेची जोड मिळाली तरच ते पूर्णत्वास जाते, हे त्यांनी अधोरेखित केल.प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याने रुग्ण, समाज आणि संस्थेबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रामाणिकपणे त्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.


दि 3 एच'एस –तीन घटकांची सांगड हा भविष्यातील आदर्श डॉक्टर घडवतो, असे त्यांनी सांगितले.

शिस्त, अध्ययनातील सातत्य आणि वैद्यकीय कौशल्य यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 वागणूक, संवाद, रुग्णांशी असलेला संवाद, गोपनीयता आणि वेळेचे नियोजन यांना वैद्यकीय व्यावसायिकतेत विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.


रुग्णसेवा ही टीमवर्कवर आधारित असते. नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन, सहकारी डॉक्टर यांच्याशी समन्वय केल्यासच रुग्णांना उत्कृष्ट सेवा देता येते, असे त्यांनी सांगितले.


 वाशिमसारख्या शांत आणि शिक्षणास पोषक ठिकाणी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अधिक लक्ष केंद्रीत करता येते, असेही त्यांनी सांगितले.

 सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाशी जोडून घेतल्यास विद्यार्थी अधिक संवेदनशील, जबाबदार व समजूतदार डॉक्टर बनतात, असे त्यांनी स्पष्ट केले.


त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्त, नीतिमूल्ये, सेवाभाव आणि व्यावसायिकतेची शपथ घेत ‘व्हाईट कोट’ धारण केला. 


कार्यक्रमास अध्यापक, विद्यार्थी  उपस्थित होते. मेडिकल प्रोफेशनमध्ये प्रवेशाचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि अभिमानाचे वातावरण होते. संचालन डॉ. अनुश्री तरोडे आणि डॉ. स्वाती कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तमन्ना तालरेजा, ऋचा जाधव, राशी धोंडे, यश पांडव यांनी केले.तर आभार चंदन वत्स यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Response to "डॉक्टर जीवन वाचवणारे, वेदना कमी करणारे आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करणारे मानवतेचे सेवक आहेत. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article