-->

प्रारंभिक बाल्यावस्थेत बालसंगोपन आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोषण भी पढाई भी” या प्रशिक्षण उपक्रमास    जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांनी भेट

प्रारंभिक बाल्यावस्थेत बालसंगोपन आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोषण भी पढाई भी” या प्रशिक्षण उपक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट

 


 "पोषण भी पढाई भी” प्रशिक्षण उपक्रमास जिल्हाधिकाऱ्यांची भेट 


साप्ताहिक सागर आदित्य 

बालसंगोपन आणि पूर्वशिक्षणासाठी अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


प्रारंभिक बाल्यावस्थेत बालसंगोपन आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोषण भी पढाई भी” या प्रशिक्षण उपक्रमास 

 जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर यांनी भेट 

देऊन प्रशिक्षण सत्राचे निरीक्षण केले. त्यांनी प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पोषणाचा संतुलित समन्वय साधण्याचे आवाहन केले.


या प्रसंगी संजय गणवीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद वाशिम, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी अनिल उल्हामाले, इ-आकार (रॉकेट लर्निंग) जिल्हा समन्वयक स्नेहा वरकड, कोर्स निर्देशक अर्चना फाले, अमिता गिऱ्हे, तसेच मुख्य प्रशिक्षक दिपाली कांबळे, मीना गव्हादे, ज्योती महल्ले, नूतन धोटे, सुरेखा बोळे, मैथिली घनवट, जयश्री देवगिरीकर आणि सर्व प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


‘पोषण भी पढाई भी’ हा उपक्रम शासनाच्या २०२३ पासून सुरू झालेल्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांपैकी एक असून, तीन ते सहा वयोगटातील बालकांमध्ये पूर्वशालेय शिक्षणाची बीजे रुजविणे हा याचा मुख्य हेतू आहे. या प्रशिक्षणामध्ये बालकांसाठी शिक्षणासोबत खेळ, गोष्टी, चित्रकला, गाणी, नाट्य अशा कृतींद्वारे शिकत-शिकवत मजेत शिकण्याचे वातावरण निर्माण करणे यावर भर दिला जातो.


‘नवचेतना’ उपक्रमाद्वारे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास


या प्रशिक्षण सत्रात ‘नवचेतना’ या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. या अंतर्गत शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा साधायचा याबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले. मातांशी नियमित संवाद साधून पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि मानसिक प्रगती या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, “बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी ही पहिली शाळा असते. येथेच त्यांच्या शिक्षणाची, संस्कारांची आणि सामाजिक जाणिवेची सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक सेविकेने बालकांशी प्रेम, संयम आणि सृजनशीलतेने वागावे. पोषण आणि शिक्षणाचा समतोल साधून ‘पोषण भी पढाई भी’ हा उपक्रम आदर्श ठरवावा.


या भेटीमुळे प्रशिक्षणार्थी सेविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार सेविकांनी व्यक्त केला.

0 Response to "प्रारंभिक बाल्यावस्थेत बालसंगोपन आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोषण भी पढाई भी” या प्रशिक्षण उपक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article