-->

आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियोजनाचे टप्प्यांनिहाय सादरीकरण करण्यात आले.

आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियोजनाचे टप्प्यांनिहाय सादरीकरण करण्यात आले.



 साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या  नियोजनाचे टप्प्यांनिहाय सादरीकरण 


वाशिम,  आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियोजनाचे टप्प्यांनिहाय सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकरण सकाळी ९.४५ ते ११  या वेळेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडले.


या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, सर्व तहसीलदार व न.प.मुख्याधिकारी,  निवडणूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.


या दरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी निवडणुकीच्या सर्व टप्प्यांचे सादरीकरण काळजीपूर्वक ऐकून घेतले व आवश्यक सूचना दिल्या. निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन, मतदार सूचीचे अद्ययावतीकरण, मतदान केंद्रांची अंतिम यादी, साहित्य वितरण, प्रशिक्षण सत्रांचे नियोजन, तसेच मतदान प्रक्रियेतील अचूकता आणि पारदर्शकता या सर्व घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये जिल्हाधिकारी . कुंभेजकर यांनी म्हटले की, निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील व जबाबदारीची आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या भूमिकेत शंभर टक्के तत्परता दाखवून काम करावे. कोणत्याही टप्प्यावर दुर्लक्ष होऊ नये, हे सुनिश्चित करावे.


या सादरीकरणाद्वारे निवडणुकीपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज असून, सर्व टप्प्यांवर समन्वय आणि शिस्तबद्धता राखत कार्यवाही करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 Response to "आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियोजनाचे टप्प्यांनिहाय सादरीकरण करण्यात आले."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article