जिल्हाधिकारी कार्यालयात एकता, अखंडता आणि संकल्पाचा संदेश राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिनानिमित्त अभिवादन व शपथ
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी कार्यालयात एकता, अखंडता आणि संकल्पाचा संदेश
राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिनानिमित्त अभिवादन व शपथ
वाशिम, भारताचे पहिले उपपंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दि.३१ ऑक्टोबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त (राष्ट्रीय संकल्प दिन) त्यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
भारतीय एकात्मतेसाठी निश्चयपूर्वक धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकता व अखंडतेची शपथ देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालयात एकता, अखंडता आणि संकल्पाचा संदेश राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिनानिमित्त अभिवादन व शपथ"
Post a Comment