-->

शासनमान्य ग्रंथांची यादी" करिता सन २०२४ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत

शासनमान्य ग्रंथांची यादी" करिता सन २०२४ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत



 साप्ताहिक सागर आदित्य 

शासनमान्य ग्रंथांची यादी" करिता सन २०२४ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत


वाशिम  राज्यातील शासकीय तसेच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या नव्या ग्रंथांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या खरेदीस मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने ग्रंथालय संचालनालयाकडून दरवर्षी “शासनमान्य ग्रंथांची यादी” प्रकाशित करण्यात येते. या यादीसाठी ग्रंथ निवड समितीच्या सदस्यांकडून निवड व शिफारस केलेले ग्रंथ समाविष्ट केले जातात.


सन २०२४ या कॅलेंडर वर्षामध्ये (१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांचा शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्यासाठी, संबंधित ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रती (complimentary copy) दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठविण्यात यावी.


ग्रंथालय संचालक,

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य,

शहीद भगतसिंग मार्ग, टाऊन हॉल, मुंबई – ४०० ००१


असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक  अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

0 Response to "शासनमान्य ग्रंथांची यादी" करिता सन २०२४ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article