-->

विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक


 साप्ताहिक सागर आदित्य 

विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक


वाशिम,दि.१४ ऑक्टोबर  दिवाळी सणानिमित्त बेकायदेशीपणे विस्फोटकांची साठवणूक करणे व त्याची विक्री करण्यास आळा बसावा. याकरीता जिल्हयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हयासाठी,उपविभागीय दंडाधिकारी,वाशिम, मंगरूळपीर व कारंजा यांना त्यांच्या उपविभागाकरीता,तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,वाशिम, मालेगांव,रिसोड,कारंजा,मंगरुळपीर व मानोरा यांना त्यांच्या तालुक्याकरीता व नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,वाशिम,मालेगांव, रिसोड,कारंजा,मंगरुळपीर आणि मानोरा यांना त्यांच्या क्षेत्राकरीता विस्फोटक अधिनियम २००८ चे नियम १२८ नुसार १५  ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे.

           या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील उपविभाग व तालुक्यामध्ये नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका व ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती ठरवतील,अशा खुल्या जागेत व पटांगणामध्ये फटाक्यांची दुकाने लावली जातात.तर सार्वजनिक ठिकाणी,निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री व साठवणूक केली जाणार नाही.याची दक्षता घेवून अशा ठिकाणी लावल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांची व अवैध फटाके दुकानांची तपासणी करण्यात यावी. जे परवानाधारक अटी व शर्तीचे पालन करणार नाही,अशा दोषी फटाके परवानाधारकांवर विस्फोटक नियम २००८ च्या नियम १२८ नुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.असे जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आदेशात नमुद केले आहे. 

           

0 Response to "विस्फोटकांची साठवणूक व विक्रीस आळा बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article