
सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदांची भरती; ७२ पदासाठी अर्ज मागविले माजी सैनिकांसाठी संधी
साप्ताहिक सागर आदित्य
सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदांची भरती; ७२ पदासाठी अर्ज मागविले
माजी सैनिकांसाठी संधी
वाशिम, दि. १३ ऑक्टोबर सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) या एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.या पदांपैकी एक पद दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव असून, किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता आणि उपलब्धतेनुसार भरती करण्यात येणार आहे.सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन (TCS-iON) यांच्या मार्फत पार पडणार असून, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कोणत्याही अन्य माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Resources Tab → Recruitment Tab मध्ये जाऊन १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजतापासून ते ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जासाठीची लिंक बंद होईल.जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक उमेदवारांनी या भरती संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
0 Response to "सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदांची भरती; ७२ पदासाठी अर्ज मागविले माजी सैनिकांसाठी संधी"
Post a Comment