-->

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी                         राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव   लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक

 


साप्ताहिक सागर आदित्य 

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी 

                      राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव 

लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक 


वाशिम,  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा आहे. वाशिम जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.

  वाशिम जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक असून इथुन पुढेही असेच कार्य करावे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ संबंधी श्री.नरूकुल्ला यांच्या अध्यक्षतेत बैठक नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

    यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव,उपसचिव देवेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


आयुक्त श्री. नरूकुल्ला म्हणाले की, या कायद्यानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळणे आवश्यक आहे. लोकसेवा हक्क कायदा संपूर्ण राज्यात सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू करण्यात आला आहे. विहित कालावधीत सेवा पुरविली नसल्यास ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे, विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

ते पुढे म्हणाले की, कायद्याच्या अंमलबजावणीत क्रमवारीनुसार वाशिम जिल्हा ४ थ्या क्रमांकावर जिल्हा आहे. याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिका-यांचे मूल्यमापन नियमित करणे आवश्यक आहे. कायदा लागू होऊन अनेक वर्षे झाली असतानाही अधिसूचित सेवांबाबत अधिकारी अनभिज्ञ असतील तर ते गंभीर आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अर्जदाराला न्याय मिळवून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ज्या विभागाच्या सेवा  ऑफलाईन आहेत.त्या विभागांनी ऑनलाईनसाठी त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रदान करण्यात आलेले २६६, जिल्हापरिषद अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये ४९१ , नगर परिषद / नगरपंचायत मध्ये ६ आपले सरकार सेवा केंद्र असून जिल्ह्यात एकूण ७६३ आपले सरकार केंद्र आहेत. यावेळी जिल्ह्यातील सर्वोत्तम १० आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहिती दिली. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील महसूल विभागाचे प्रथम अपील २२३ प्राप्त झाले होते त्यापैकी २२२ प्रकरणी निकाली काढण्यात आले. जिल्ह्यातील महसूल विभागाचे द्वितीय अपील ७ प्रकरणे प्राप्त झाली होती त्यापैकी सातही निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेद्वारे ४०८ प्रथम अपील , व्दितीय अपील १७ प्रकरणे प्राप्त झाले. त्यापैकी अनुक्रमे ४०८ व १७ प्रकरणे ही निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यंत्रणांनी कार्यमूल्यमापन रिपोर्टस अद्ययावत करावे.विभागनिहाय अधिसूचित सेवांची माहिती यावेळी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत २७ विभागाच्या २ लक्ष ४५ हजार १२ सेवांची वनटाईम डिलीव्हरी झाली आहे.त्याचे प्रमाण ९८.८० टक्के असल्याचे सांगितले.पदनिर्देशित अधिकारी व सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येते.तसेच ज्यांना प्रशिक्षण हवे असल्यास त्याची माहिती गुगल फॉर्मव्दारे कळवावे.असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.पीपीटी सादरीकरण जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांनी केले.बैठकीला विविध यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

0 Response to "लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article