
भा.मा. कन्या शाळेत माता पालक कार्यकारणी गठीत.
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा. कन्या शाळेत माता पालक कार्यकारणी गठीत.
रिसोड तालुक्यातील एकमेव नाविन्यपूर्ण उपक्रमशील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 22 जुलै रोजी माता पालक संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांनी माता पालक संघ स्थापन करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सामाजिक,भावनिक विकासासाठी कसा करता येईल हा केवळ माता पालक संघ स्थापन करण्याचा हेतू असून यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे मत आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले. त्यानंतर माता पालक संघाची कार्यकारणी गठित करण्यात आली. या माता पालक संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालकांमधून अध्याक्षा सौ. सुनीता केशव गायकवाड , उपाध्यक्षा सौ. शारदा संतोष डव्हळे, व शिक्षकांमधून उपाध्यक्ष वसंत बुंदे शास्त्री सर तर शिक्षकांमधून सचिव आनंद झडपे सर, सहसचिव सौ.कल्पना रवी सरनाईक या सर्वांची निवड सर्वानुमते करण्यात आली. नंतर या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित माता पालकांमधून अध्यक्ष असलेल्या सुनिताताई केशव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना भारत माध्यमिक कन्या शाळा म्हणजे एक सुसंस्काराचे माहेरघर असून आमच्या मुली येथे संस्कारक्षम बनतात. असे सूचक विधान आपल्या मनोगतातून केले. तद्वतच पालकांमधून रविकांत तेजराव सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना मनोगत शाळेच्या कामकाजात पालकाना सक्रिय पणे सहभागी करून घेणे आणि शाळेच्या विकासासाठी त्यांच्या सूचना आणि कल्पनांचा उपयोग करणे गरजेचे आहे. असा सूचक सल्ला दिला. त्यानंतर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आदरणीय सुधीर देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातून माता पालकांना संबोधित करताना विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकडे आम्ही कसे लक्ष देतो आणि विद्यार्थीनी कशा गुणवत्तापूर्ण घडतील त्यासाठी आम्ही सर्व गुरुजन वर्ग अहोरात्र कष्ट घेत असतो. तुम्हा पालकांचाही तेवढाच सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी असणे गरजेचा आहे. असा आपल्या मनोगतुन सुचक सल्ला दिला. शेवटी कन्या शाळेच्या प्राचार्या व माता पालक संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी माता पालकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे शिक्षकाचे महत्त्व आहे त्याहीपेक्षा जास्त त्याच्या जडणघडणीमध्ये पालकाचाही सहभाग असणे गरजेचे आहे. पाल्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षणामध्ये सुधारणा आणि त्याचे समस्या निवारण करण्यासाठी पालक जागृत आणि सजग असणे महत्त्वाचे आहे.शिक्षक पालक आणि विद्यार्थीनी या तिघांमध्ये समन्वय असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल आहे.असा मोलाचा सुचक सल्ला आपल्या मनोगतातून व्यक्त केला. शेवटी माता पालकांसाठी चहा नाश्त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापिका विजया कौटकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात माता पालक उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "भा.मा. कन्या शाळेत माता पालक कार्यकारणी गठीत."
Post a Comment