-->

शेतकरी बांधवांनो...! नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

शेतकरी बांधवांनो...! नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस



 साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकरी बांधवांनो...! नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा

      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


नैसर्गिक शेतीच्या दिशेने वाशिमचे पाऊल पडते पुढे  !


बायोडायनामिक कंपोस्ट स्पर्धा २०२४-२५ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न 


 नैसर्गिक शेती ही केवळ शेतीपद्धती नाही, ती आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक समृद्धी यांचा संगम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा,व 

शेतीची नवसंस्कृतीची जपावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.


स्व. संजय रोमन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित बायोडायनामिक कंपोस्ट स्पर्धा २०२४-२५ चा पुरस्कार वितरण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘राजे वाकाटक सभागृहात’ आज दि.१७ जुलै रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. बोलत होत्या.

      यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा, सर्ग विकास समितीचे राजेश तिवारी व विनीता शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     विनीता शहा यांनी यावेळी नैसर्गिक व बायोडायनामिक शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करत शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.

      स्पर्धेमधून निवडलेल्या उत्कृष्ट बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

      या दरम्यान पिक विमा योजनांच्या पत्रकाचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पत्रकातून शेतकऱ्यांना विमा योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

        कार्यक्रमाचे संयोजन प्रेरणादायी वातावरणात पार पडले. नैसर्गिक शेतीच्या दिशेने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

      कार्यक्रमात सर्व विकास समितीचे पदाधिकारी, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार अभिजीत वंजारे यांनी मानले.

    कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन प्रेरणादायी वातावरणात पार पडले.

नैसर्गिक शेतीच्या दिशेने हा उपक्रम एक सकारात्मक आणि मार्गदर्शक पाऊल ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

0 Response to "शेतकरी बांधवांनो...! नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article