-->

घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक  किरण गणेश कोवे यांनी केले

घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले



साप्ताहिक सागर आदित्य 

 "आवास मित्र" ॲपमुळे घरकुल बांधकामाला गती.

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा राबविणार जानागृती मोहिम

वाशिम 

शासनाच्या विविध आवास योजनांतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रक्रियेत अधिक सुलभता व पारदर्शकता यावी, तसेच कामाला गती मिळावी, यासाठी "आवास मित्र" नावाचे नवीन ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप लाभार्थी-केंद्रित असून घरकुल बांधकामाचे टप्प्यांनुसार फोटो अपलोड करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे हफ्त्यांचे वितरण अधिक वेगाने व अचूक पद्धतीने होणार असून प्रशासकीय विलंबालाही चाप बसणार आहे. याबाबत लाभार्थ्यांना अधिक माहिती मिळावी म्हणुन जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या वतीने गावात जाऊन जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती डीआरडीए च्या वतीने देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना खालील सुविधा मिळणार:

घरकुल बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे फोटो अपलोड करण्याची सुविधा

हफ्ते वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान

PMAY-G ID नसेल, तर ती तपासण्याची लिंक

लॉगिन प्रक्रियेची सविस्तर माहिती

Power BI डॅशबोर्डवरून जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर प्रगती अहवाल पाहण्याची सोय.

घरकुल बांधकामात सहभागी सर्व लाभार्थ्यांनी "आवास मित्र" ॲपचा वापर करावा, आणि आपल्या घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक  किरण गणेश कोवे यांनी केले आहे.

आपले घरकुल – आपल्याच हातात! "आवास मित्र" अॅप डाउनलोड करा आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.

0 Response to "घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article