जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या उषाताई वानखेडे यांची मागणी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या
उषाताई वानखेडे यांची मागणी
वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह घरांची पडझड होऊन नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऊषाताई वानखेडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात १ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह झालेल्या
अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना महापूर आला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उडीद, मूंग, सोयाबीन, तुर, कापूस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. होत्याचे नव्हते झाले त्यामुळे शेतकरी पुर्णच खचून गेला आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऊषाताई वानखेडे यांनी केले आहे.
0 Response to "जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या उषाताई वानखेडे यांची मागणी"
Post a Comment