-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा अंडर 19 चा हॉलीबॉल संघ विभागासाठी निवड.... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा अंडर 19 चा हॉलीबॉल संघ विभागासाठी निवड.... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड



साप्ताहिक सागर आदित्य 

 भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा अंडर 19 चा हॉलीबॉल संघ विभागासाठी निवड.... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथील अंडर 19 हॉलीबॉल संघाच्या विद्यार्थ्यांनी कारंजा  येथील विद्याभारती कॉलेजच्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कन्या शाळेचा संघ सहभागी झाला असता यामध्ये 19 वर्षाखालील मुलीच्या संघाने वाशिम येथील आर.ए. कॉलेजच्या संघास अंतिम सामन्यात पराभूत करून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या .                                        तसेच 17 वर्षाखालील भारत माध्यमिक कन्या शाळेच्या  मुलीच्या संघाने प्रथम वाशिम व नंतर मंगरूळपीर च्या संघावर विजय प्राप्त करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीमध्ये कारंजा संघासोबत ते उपविजेते राहिले.                                    19 वर्ष खालील संघामध्ये असलेल्या खेळाडू  प्रणाली सरनाईक कर्णधार, ज्ञानेश्वरी बाजड, कल्पना झळके, ऋतुजा झळके, सागर जायभाय, खुशी खडसे, दुर्गा पवळ व वैष्णवी खुळे या खेळाडूंचा सहभाग होता. यशस्वी संघाचे अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून यासाठी मार्गदर्शक म्हणून कन्या शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक  सुधीर देशमुख सर यांची मोलाचे अमूल्य असे मार्गदर्शन ठरले. सर्व अंडर 17व अंडर 19च्या खेळाडूंचे महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या सौ. मंजुषा सु.देशमुख मॅडम, पर्यवेक्षक  विलासराव देशमुख सर, क्रीडा शिक्षक सुधीर देशमुख सर, व सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग या सर्वांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा अंडर 19 चा हॉलीबॉल संघ विभागासाठी निवड.... भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article