-->

वाशिमने मला खुप शिकवले;  जिल्हा परिषदेतील कार्यकाळ अविस्मरणीय ..!  निरोप समारंभ प्रसंगी वसुमना पंत यांचे भावनिक उद्गार.

वाशिमने मला खुप शिकवले; जिल्हा परिषदेतील कार्यकाळ अविस्मरणीय ..! निरोप समारंभ प्रसंगी वसुमना पंत यांचे भावनिक उद्गार.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिमने मला खुप शिकवले;  जिल्हा परिषदेतील कार्यकाळ अविस्मरणीय ..!

निरोप समारंभ प्रसंगी वसुमना पंत यांचे भावनिक उद्गार.


“वाशिमच्या लोकांकडुन  मला खुप शिकायला मिळाले असुन त्यांनी दिलेले प्रेम शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही” असे भावनिक उद्गार काढुन  जिल्हा परिषदेतील कार्यकाळ कायम अविस्मरणीय राहिल असे मत जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी  व्यक्त केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन वाशिम जिल्हा परिषदेत जवळपास पावने तीन वर्षाच्या यशस्वी कारकिर्दिनंतर वसुमना पंत यांची येथुन बदली झाली. त्यानिमित्त त्यांना निरोप देण्यासाठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नव्याने रुजु झालेले वैभव वाघमारे यांच्या स्वागतासाठी भव्य समारंभाचे आयोजन पदाधिकारी आणि अधिकारी - कर्मचारी यांच्या वतीने जिल्हा ‍ परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन  वस्त्रोद्योग विभागाचे (नागपुर) आयुक्त अविशांत पांडा, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे, माजी जि प अध्यक्ष अरविंद इंगोले, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली लळे, कृषी व पशु संवर्धन सभापती वैभव सरनाईक, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांची विचारमंचावर प्रमुख‍ उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने कार्यक्रम स्थळी वसुमना पंत, अविशांत पांड्या  आणि वैभव वाघमारे या तीनही आयएएस अधिकाऱ्यांचे मोठ्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. तिघांनाही सन्मापूर्वक  स्टेजवर आमंत्रित करुन सुरुवातीला सीईओ वैभव वाघमारे यांचा आणि नंतर वसुमना पंत यांचा पतीसह (अविशांत पांडा) भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जिल्हा ‍ परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे, माजी जि प अध्यक्ष अरविंद इंगोले, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली लळे, कृषी व पशु संवर्धन सभापती वैभव सरनाईक, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांच्या  हस्ते मान्यवरांचा मुख्य सत्कार करण्यात आला. यानंतर जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांच्यासह सर्व जि प सदस्य व ‍ पदाधिकारी यांच्या वतीने तसेच सर्व विभाग प्रमुख व  कर्मचारी यांच्या वतीने सत्कारमूर्तींचे बुके व भेटवस्तु देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. 

या अभूतपूर्व सत्काराला उत्तर देतांना वसुमना पंत म्हणाल्या कि, “‍जिल्हा परिषदचा कार्यभार हाती घेतल्यानंतर सुरुवातीला निश्चितच काही आवाहनांचा सामना करावा लागला. सीईओ या पदाबाबत अधिकारी- कर्मचारी यांच्यासह पदाधिकारी यांचा पूर्वग्रह, अपुरे मनुष्यबळ, कोविड ची साथ, जिल्हा परिषदेतील दृष्य आणि छुपे राजकारण, कर्मचाऱ्यांमधील हेवे-दावे आणि महिला अधिकारी म्हणुन असलेल्या  मर्यादांवर मात करण्यासाठी सुरुवातीचे 6 महिने गेले. नंतर मात्र पदाधिकारी, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांना न दुखावता कामे कशी करुन घ्यायची यावर भर दिला.” पुढे बोलतांना पंत म्हणाल्या, “कल्याणकारी योजनांचा लाभ लोकांना मिळावा यासाठी गावांना भेटी दिल्या. खरोखर ग्रामिण भागातील लोकांचे प्रश्न समजुन घेऊन ते सोडविण्याचे समाधान आपल्याला जिल्हा परिषदेमुळे लाभले.”

…तर पितृशक्त्तीची देखील ताकद पहायला मिळेल: वैभव वाघमारे

वसुमना पंत यांच्या कारकिर्दित सर्वांना मातृत्वाची गोडी लाभली, त्यांनी आपल्यातील मातृशक्तीची ताकद दाखवली आहे, येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुम्हाला पितृशक्त्तीची देखील ताकद पहायला मिळेल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नव्याने रुजु झालेले वैभव वाघमारे यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन सेवा दिलेल्या वसुमना पंत यांना निरोप देण्यासाठी व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन नव्याने रुजु झालेले वैभव वाघमारे यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधीनी आपल्या मनोगतामध्ये  भरभरुन शुभेच्छा दिल्या. काही लोकप्रतिनिधींनी नविन सीईओ यांनी सुध्दा वसुमना पंत यांच्याप्रमाणेच आपली कार्यपध्दती ठेवावी अशी अपेक्षा बोलुन दाखवली. या पार्श्वभूमीवर सीईओ वैभव वाघमारे यांनी आपली थोडक्यात भूमिका मांडली.  ते म्हणाले कि, “ज्या पध्दतीने आई घर  सांभाळते त्या पध्दतीने पंत मॅडमनी जिल्हा परिषद सांभाळली असे नि:संकोचपणे जाणवते. ज्या पध्दतीने मॅडमनी जिल्हा  परिषद हाताळली तशीच प्रेरणा आणि उर्जा मलाही मिळावी अशी मनोकामना करतो. त्यांनी आपल्यातील मातृशक्तीची ताकद दाखवली आहे, येणाऱ्या काळामध्ये कदाचित तुम्हाला पितृशक्त्तीची देखील ताकद पहायला मिळेल.”

जिल्हा परिषदेच अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी समारोपीय भाषणातुन अडीच वर्षे सीईओ वसुमना पंत यांच्यासोबत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला आणि समाधान व्यक्त केले. वसुमना पंत यांना (मातृशक्ती) देवीची तर वैभव वाघमारे यांना पांडुरंगाची उपमा दिली. अध्यक्ष ठाकरे यांनी नुकतीच वाशिम येथुन बदली झालेल्या वसुमना पंत, नव्याने रुजु झालेले सीईओ वैभव वाघमारे आणि नागपुर येथे बदली झालेल्या अविशांत पांडा या तीनही आयएएस अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी कारर्दिसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, मंगरुळपीर गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने,  निता डाखोरे (पवार) आणि राम श्रृंगारे यांनी मनोगत व्यक्त केले. लोकप्रतिनिधींच्या वतीने जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे, माजी जि प अध्यक्ष अरविंद इंगोले, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे, सुधिर कव्हर आणि दिलीप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

 

---***---

राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

0 Response to "वाशिमने मला खुप शिकवले; जिल्हा परिषदेतील कार्यकाळ अविस्मरणीय ..! निरोप समारंभ प्रसंगी वसुमना पंत यांचे भावनिक उद्गार."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article