-->

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा        जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  उत्साहात निघाली तिरंगा रॅली  उपस्थितांनी घेतली तिरंगा प्रतिज्ञा

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस उत्साहात निघाली तिरंगा रॅली उपस्थितांनी घेतली तिरंगा प्रतिज्ञा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा

      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

उत्साहात निघाली तिरंगा रॅली

उपस्थितांनी घेतली तिरंगा प्रतिज्ञा


वाशिम दि.१३ ऑगस्ट (जिमाका) हर घर तिरंगा अभियानांतर्गत  १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान जिल्हा भरात राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज १३ ऑगस्ट रोजी वाशीम येथे उर्दू हायस्कूल जुनी नगरपरिषद दिघेवाडी येथुन महेश भवन ट्रस्ट पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

                जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे,अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर,जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, मुख्याधिकारी निलेश गायकवाड,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

               ऊर्दू हायस्कूल जुनी नगरपरिषद येथून मार्गक्रमण करीत ही तिरंगा रॅली  महेश भवन ट्रस्ट परिसरापर्यंत पोहोचली.येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा प्रतिज्ञा घेतली.रॅलीदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता की जय, यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. या घोषणा व देशभक्तीमय गीतांनी वाशिमचा परिसर दुमदुमुन गेला होता. 

या अभियानांतर्गत तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

    तसेच या रॅलीमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. "मतदानाइतके अमूल्य नसे काही.. मताधिकार बजावू हमखास" चा सुध्दा  जागर करण्यात आला.

     रॅलीमध्ये शालेय मुले -मुली, एनसीसी कॅडेट्सचे विद्यार्थी , स्काऊट गाईडचे विद्यार्थी, होमगार्ड, राष्ट्रीय सेवा योजना आदींचा सहभाग उत्साहवर्धक होता. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन करून आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.

0 Response to "हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस उत्साहात निघाली तिरंगा रॅली उपस्थितांनी घेतली तिरंगा प्रतिज्ञा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article