-->

एक धाव सुरक्षेची’…’ म्हणत वाशिमकर धावले अन् जिंकलेही…!

एक धाव सुरक्षेची’…’ म्हणत वाशिमकर धावले अन् जिंकलेही…!

 


साप्ताहिक सागर आदित्य 

'एक धाव सुरक्षेची’…’ म्हणत वाशिमकर धावले अन् जिंकलेही…!


महसुल पंधरवड्यात 'महामॅरेथॉन' उत्साहात संपन्न


जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दाखविली हिरवी झेंडी


        वाशिम, दि. १३ ऑगस्ट (जिमाका): ‘एक धाव सुरक्षेची’…’ हे घोषवाक्य घेऊन वाशिमकर आज सकाळी ७ वाजता उर्दू हायस्कूल जुनी नगरपरिषद –डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- ते पुन्हा उर्दू हायस्कूल अशा  दोन किलोमीटरच्या महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले…धावले आणि जिंकलेही….!  

     सकाळी सात वाजता सुरु झालेली ही दोन किलोमीटरची महामॅरेथॉन स्पर्धा  ! पर्यावरण वाचवा.. जीवन वाचवा, झाडे लावा..झाडे जगवा, अर्थिंगचे योग्य संचलन, करेल घराचे रक्षण, पुरा पूर्वी पशु प्राण्यांना बांधू नका, त्यांचा जीव धोक्यात घालून नका, “ सुरक्षेला महत्त्व द्या',रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षेला महत्त्व द्या, ध्वनी प्रदूषणाला घाला आळा, ‘वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा’ असे अनेक जनजागृतीपर संदेश देत मंगळवारची पहाट उजाडली. पूर, भूकंप, ह्दय विकाराचा झटका, , सर्पदंश, त्सुनामी, आग, वीज आदींबाबत जनजागृती करण्यात आली.या महामॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाची तयारी वाशिम जिल्हा प्रशासनाने केली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,चौरंग संस्था, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही महामॅरेथॉन संपन्न झाली.

       जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी महामॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता ठोसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांचे वडील श्री . सुरीयण आणि भाऊ जयकुमार सुरीयण यांनीही स्पर्धेत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित केला. श्री .सुरीयण यांचे वय ६८ वर्ष असून त्यांनी मॅरेथॉन यशस्वी पूर्ण केली. तेव्हा मात्र ..! जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे पाणावले बरं का..!  बाकलीवाल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे शिक्षिक अमोल काळे व त्यांच्या शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी जनजागृतीकडे लक्ष वेधले होते.

    नैसर्गिक आपत्तीच्या काळात खबरदारी, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही या महामॅरेथॉन स्पर्धेतून करण्यात आले. छोट्या मुलींपासून ते वयोवृद्ध  या स्पर्धेमध्ये सहभागी होत उत्साहाच्या वातावरणात मॅरेथॉन स्पर्धेचा मूळ उद्देश पूर्ण करत.  ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत ही वाशिमकरांनी ही महामॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. 

    महामॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश वार्ड, द्वितीय सुरज जाधव, तृतीय क्रमांक किशोर बेंद्रे, चतुर्थ क्रमांक लखन राठोड यांनी पटकावला. या विजयी स्पर्धकांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरा केल्या.

     शालेय मुले -मुली, एनसीसी कॅडेट्सचे विद्यार्थी , स्काऊट गाईडचे विद्यार्थी, होमगार्ड, राष्ट्रीय सेवा योजना आदींचा सहभाग उत्साहवर्धक होता. या महामॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन करून आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.

0 Response to "एक धाव सुरक्षेची’…’ म्हणत वाशिमकर धावले अन् जिंकलेही…!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article