कै. शांताबाई सत्यनारायणजी साबू यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
कै. शांताबाई सत्यनारायणजी साबू यांचे मरणोत्तर नेत्रदान
मौजे वाशिम ता.वाशिम जि. वाशिम येथील सुशिल सत्यनारायणजी साबू यांची आई स्व. शांताबाई सत्यनारायणजी साबू यांच्या वयाच्या ७६ व्या वर्षी दिनांक १०/०८/२०२४ रोजी सकाळी ०७:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण साबू कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. शांताबाई सत्यनारायणजी साबू यांचे निधन झाल्याने संपुर्ण साबू कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना साबू कुंटुबीयांनी एवढ्या दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा सुनिल गटटानी याच्यांकडे व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व शांताबाई सत्यनारायणजी साबू यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता डॉ. शांतिलालजी, कचरुलालजी, सुरेशचन्द्रजी, राधेश्यामजी, जुगलकिशोरजी साबू, सत्यनाराणजी साबू, ओम राऊत, सुधिर साळवे, गणेश व्यवहारे व समस्त साबू कुटूविंयाचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन साबू कुटूंबाचे आभार मानले आहेत.
0 Response to "कै. शांताबाई सत्यनारायणजी साबू यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment