कै. रजनीताई सदाशिवराव देशमुख यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
कै. रजनीताई सदाशिवराव देशमुख यांचे मरणोत्तर नेत्रदान
मौजे आसन गल्ली रिसोड ता. रिसोड जि. वाशिम येथील माजी नगरअध्यक्ष पंडितराव देशमूख यांची बहिण स्व. रजनीताई सदाशिवराव देशमुख (अमडापूरकर) यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी दिनांक १९/०७/२०२४ रोजी दूपारी १२:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपूर्ण देशमुख कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै. रजनीताई सदाशिवराव देशमुख अमडापूरकर यांचे निधन झाल्याने संपुर्ण देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना देशमुख बुंटुंबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा ओम राऊत याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक श्री. रमेश ठाकरे, यांनी स्व रजनीताई सदाशिवराव देशमुख यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता सदाशिवराव देशमुख अमडापूरकर (पती), गणेश सदाशिवराव देशमूख (मूलगा), पंडितराव देशमूख, भागवतराव देशमूख, श्रीरामराव देशमूख, संतोपराव देशमूख, गणेश देशमूख, अमोल देशमूख, आनंता देशमूख, गौरव देशमूख, दिपकराव देशमूख, कैलास देशमूख समस्त देशमुख कुटूबिंयाचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव बाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन देशमुख कुटूंबाचे आभार मानले आहेत.
0 Response to "कै. रजनीताई सदाशिवराव देशमुख यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment