-->

रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सन 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी तालुक्यातील पहिली

रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सन 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी तालुक्यातील पहिली

 


साप्ताहिक सागर आदित्य 

रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सन 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी तालुक्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत ठरले आहे. त्यामुळे गावात आनंद व्यक्त केला जात आहे यापूर्वी सन 2022 मध्ये लोणी बुद्रुक ग्रामपंचायत ला राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रधानमंत्री आवास अभियान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा ,विद्युत पुरवठा तसेच नागरिकांना विविध कामासाठी लागणारे दाखले जागेचे ८ अ ऑनलाईन दिले जातात तसेच प्रत्येक घरी शौचालय अशा सर्व बाबी आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी लोणी बुद्रुक ग्रामपंचायत ने उपलब्ध करून दिल्याने यावर्षी ग्रामपंचायतला आयएसओ  मानांकन मिळाले आहे 25 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोणी बुद्रुक येथे मानांकन प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमास रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे साहेब,विस्तार अधिकारी पंचायत खिल्लारे साहेब,आय एस ओ लेखापरीक्षक नागपूर शुभांगी कोल्हे मॅडम,विनोद कोल्हे साहेब, सरपंच प्रिया चौगुले उपसरपंच पारवे, ग्रामपंचायत सचिव रजनी डोंगरदिवे ग्रामपंचायत सदस्य भास्कर नरवाडे ,निलेश बोडखे ,रामेश्वर टकले ,प्रवीण बोडके ,विनोद बोडखे,अरविंद इंगोले ,संतोष खेलबाडे,वामन नलनकर तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर रवी बोडके आनंदा सानप बबन पुनवे प्रकाश पारवे अशोक पारवे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. 


ग्रामपंचायत लोणी बुद्रुक येथे रजू होऊन अवघे एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही रुजू होतास लोणी बुद्रुक ग्रामपंचायत इथला जलद गतीने विकास होण्यासाठी ग्रामपंचायत आयएसओ करणे माझे स्वप्न होते ते आज साकारले त्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली तसेच गावकऱ्यांनी देखील मोलाचे सहकार्य केल्यानेच हे होऊ शकले ग्रामपंचायतचा आयएसओ दर्जा टिकवणे गतिमानता व लोकाभिमुख कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत.


 रजनी डोंगरदिवे

 सचिव ग्रामपंचायत लोणी बुद्रुक 


ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन मिळाले आहेत खरे तर ही आनंदाची बाब आहे हे माझ्या एकटीचे यस नसून यासाठी ग्रामपंचायतीने सर्व पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी तालुकास्तरीय अधिकारी यांची मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभल्याने हे यश मिळाले आहे .


प्रिया चौगुले 

सरपंच

ग्रामपंचायत लोणी बुद्रुक.

0 Response to "रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सन 2024 ते 2027 या तीन वर्षासाठी तालुक्यातील पहिली"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article