मुलींच्या वसतिगृहात रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया
साप्ताहिक सागर आदित्य
मुलींच्या वसतिगृहात रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया
वाशिम, अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी शहरातील सिव्हील लाईन येथील वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ - २०२५ च्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थीनींचे अर्ज महाविद्यालयामार्फत मागविण्यात येत आहेत.
वसतिगृहामध्ये ७० टक्के आरक्षण अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी राखीव व उर्वरित ३० टक्के जागा बिगर अल्पसंख्याक मुलींसाठी आहेत.
७० टक्के जागांच्या प्रवेशाकरिता
अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा जागा शिल्लक राहिल्यास सदर जागा बिगर अल्पसंख्याक मुलींमधून भरण्यात येतील वसतिगृहात मागील सत्रात राहत असलेल्या विद्यार्थीनींना नियमानुसार प्राधान्य देण्यात येईल. वसतिगृहात प्रवेश इयत्ता १२ वीतील गुणाच्या
टक्केवारीनुसार देण्यात येईल. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थीनींना प्रत्येक सत्रासाठी २८५० रु. शुल्क आकारणी राहील. अल्पसंख्याक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा
रु.८ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना शुल्क माफ असेल. विद्यार्थीनींना
महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक २१ जून पर्यंत सादर करावे.प्रवेश प्रक्रिया दिनांक २५ जून पर्यंत सकाळी ११ वाजता राबविण्यात येईल. त्यासाठी सर्व विद्यार्थीनी व पालक वर्ग यांनी वसतिगृहात उपस्थित राहावे.असे प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांनी आवाहन केले आहे.
वरील माहिती शासकीय तंत्रनिकेतन, वाशिमच्या www.gpwashim.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.असे प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन वाशिम यांनी कळविले आहे.
0 Response to "मुलींच्या वसतिगृहात रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया"
Post a Comment