आटत नसतो रक्ताचा झरा, दर तीन महिन्याला रक्तदान करा!
साप्ताहिक सागर आदित्य
आटत नसतो रक्ताचा झरा, दर तीन महिन्याला रक्तदान करा!
जागतिक रक्तदान दिवस 14 जून रोजी आहे या दिवशी तरुण मंडळीने रक्तदान करावे असे अव्हान करण्यात येते.
उन्हाळा आला की रक्ताची उणीव भासू लागते. त्यात उन्हाचा वाढता पारा यामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यास रक्तदाता शोधावा लागतो. जिल्ह्यामध्ये रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना नियमितपणे रक्तपुरवठा करावा लागतो. तसेच थेलेसेमिया, सिकलसेल अॅनिमिया यांना देखील रक्तपिशवीची आवश्यकता भासते. त्यांना वेळेत रक्त मिळावे, यासाठी रक्तसाठा मुबलक प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
रक्तकेंद्रामध्ये
थेलेसेमिया, सिकलसेल अॅनिमिया आणि हिमोफेलिया या रुग्णांना दर पंधरा ते एक महिन्याला रक्त घ्यावे लागते. रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जातात आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये रक्ताची पूर्तता करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करावे,
रक्तदान कोण
करू शकतं?
रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचं वय १८ ते ६५ दरम्यान असावे, पुरुष ३ महिन्यातून एकदा, तर महिला ४ महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात. रक्तदान करण्यासाठी वजन ४५ किलोपेक्षा कमी नसावे, आणि रक्तदात्याच्या शरिरातील हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅमपेक्षा कमी नसावे
रक्तदानाचे
फायदे काय?
रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तदान केल्याने शरिरातील विशेषतः पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मयदिपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित स्वत्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो. याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते. वजन नियंत्रणात राहते.
रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे? • रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा.
• रक्तदानापूर्वी कमीतकमी ४ तास अगोदर जेवण केलेलं असावं. तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी, असे एनएसीओच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे.
• रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रक्तदान करण्यापूर्वी लोहयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता.
• रक्तदान केल्यानंतर आहारात फळांचा समावेश करा.
(रक्त हे कुठल्या कंपनी मधे तयार होत नाही ते फक्त मानवी शरीरा मधे तयार होते ,रक्तला पर्याय नाही नियमित रक्तदान करा.)
0 Response to "आटत नसतो रक्ताचा झरा, दर तीन महिन्याला रक्तदान करा!"
Post a Comment