चांगल जेवण कोणतं?बाहेरचं की घरचं ?
साप्ताहिक सागर आदित्य
चांगल जेवण कोणतं?बाहेरचं की घरचं ?
"चांगल जेवण कोणतं? घरच की बाहेरच? हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याच लोकांना बाहेरच जेवण जास्त आवडतं. बहुतांश लोक तर घरी जेवतच नाही.. मग खरच चांगल जेवण कोणतं? खरं तर माझं स्पष्ट मत आहे की, सर्वात चांगल जेवण घरचच असतं.. कारण त्या जेवणात आपली आई, बहीण, बायको यांची माया प्रेम, मैत्रीभाव मिक्स झालेला असतो.. आपल्या मुलाने पोटभर जेवावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते त्यामुळे ती जेवण बनवताना काळजी घेते, जेवण बनवताना तिच्या हाताला कितीतरी चटके लागतात याचा कधी विचार केलाय का..? आपली आई असो, वा बायको किंवा बहीण प्रत्येक स्त्रीच्या मनात जेवण बनवतं असताना आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना असतात.. जेवण केल्यावर तो व्यक्ती खुश व्हावा इतकंच त्या बिचारीला वाटतं. स्वयंपाक बनवण्यामागे तिचे कष्ट असतातआणि तिच्या कष्टाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. कुठेतरी मी एक सुविचार वाचला होता की...
"तुमच्या आईने तुमच्यासाठी बनवलेल्या जेवणाला नाव ठेवू नका, कारण तुम्हाला तरी आई आहे, पण काही ठिकाणी आईपण नाही आणि जेवण पण नाही..!"
खरं सांगायचं तर बाहेरच जेवण मग ते हॉटेल असो वा मेस तेथील जेवण जे असते ते व्यवसायिक उद्देशाने बनवल्या जातं.. त्यामध्ये आईसारखी ममता प्रेम असेलच असं नाही.. बाहेरच जेवण चांगल असतं हा फक्त एक समज आहे आणि तो समज मनात ठेवूनच आपण हजारो रुपये खर्च करून बाहेर जेवण असतो.. खरं सांगायचं तर चांगल जेवण घरचच असतं. पण ते जेवण करताना आपल्या भावना चांगल्या नसतात. कारण आपला समज झालेला असतो की हॉटेलमधलं जेवण छान असतं. त्यामुळे आपण त्याच गैरसमजातून घरच जेवण कसतरी खात असतो आणि त्याच जेवनाला नाव ठेवत असतो.. कधीतरी आपली आई, बायको, बहीण यांच्या कष्टाच कौतुक करा.. बिचारीला चांगल वाटेल..
बाहेरच्या जेवणाची गोष्ट करायचीच झाली तर त्यामध्ये तेल आणि मसाला याचा मारा जास्त असतो आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात हार्ट अटॅक, मूळव्याध सारखे आजार जास्त वाढत आहे.. मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले तर मूळव्याध वाढतो.. आणि तेलगट पदार्थ जास्त खाल्ले तर शरीरात चरबी वाढते आणि लठ्ठपणा येतो. रक्त्तात तेलाचं प्रणाम वाढलं की रक्त घट्ट बनत आणि शरीरातील बारीक धमण्यामधून ते पुढे सरकत नाही.. आणि मग अटॅक येतो आणि माणूस गचकतो..त्यामुळे कोणत्याही गोष्टीच जास्त सेवन शरीराला घातक आहे.. बाहेर जेवण करू नका असं माझं मत नाही पण घरच्यां जेवणाला नाव ठेवू नका... कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं कोणीतरी म्हटलं आहे.. त्यामुळे या अन्नाचा अपमान करू नका..त्यामुळे बाहेर कमी, घरी जास्त जेवा जेणेकरून पोट भरेल आणि मनंही आणि सर्व कुटुंब सोबत जेवा जेणेकरून प्रेम टिकून राहील..बाहेरच्या जेवणात सुद्धा गरम मसाला आणि तेलाचा वापर कमी करणं आवश्यक आहे कारण या पदार्थाच प्रमाण शरीरात जास्त झालं की ते आजाराला निमंत्रण देत...!"
0 Response to "चांगल जेवण कोणतं?बाहेरचं की घरचं ? "
Post a Comment