१ जुलै रोजी लोकशाही दिन
साप्ताहिक सागर आदित्य
१ जुलै रोजी लोकशाही दिन
वाशिम, दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरिय लोकशाही दिनाचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येते. त्यानुसार १८ जुन २०२४ रोजी तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये तक्रारदार यांनी १५ दिवस आधी म्हणजेच ३ जुन २०२४ पर्यंत तक्रार अर्ज तहसिल कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. तसेच दर महिन्याच्या पहील्या सोमवारी जिल्हा स्तरिय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात येते. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनात तक्रारदार यांनी १५ दिवस आधी म्हणजेच १४ जुन पर्यंत तक्रार अर्ज खालीलप्रमाणे जिल्हास्तरिय कार्यालयात सादर करावा.
तक्रार अर्ज विहीत नमुन्यातच सादर करावा. तक्रारअर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशुन असावा.तालुका लोकशाहीदिन टोकन क्रमांक नमुद करण्यात यावा. तहसिलदार यांच्या अंतिम उततराची प्रत सोबत जोडलेली असावी.लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. त्यावेळी मूळ अर्जाच्या ओसीसह उपस्थित रहावे. वरील नमुन्यात अर्ज त्यासोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. वरील बाबींची पूर्तता केली नाही तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही. प्रकरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असेल तर तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही.तसेच दर महीन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन आयुक्त कार्यालय अमरावती विभाग अमरावती येथे करण्यात येते. तेथे सुद्धा वरिल प्रमाणे अर्ज सादर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे
0 Response to " १ जुलै रोजी लोकशाही दिन"
Post a Comment