सर्व शासकीय कार्यालये व शाळा तंबाखू मुक्त करा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे
साप्ताहिक सागर आदित्य
सर्व शासकीय कार्यालये व शाळा तंबाखू मुक्त करा
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे
वाशिम, तंबाखू व तंबाखूजण्य पदार्थाच्या सेवनामुळे व धुम्रपान केल्यामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. कर्करोग, हृदयविकार, हृदयाशी निगडीत रोग,फुफुसाचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमध्ये ८ ते ९ लाख मृत्यू तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे होतात. धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनापासून तरुणांना व जनसामान्यांना दूर ठेवन्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधात्मक कायदा २००३ तयार केला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कलम ४ सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी,कलम ६ अ १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकण्यास बंदी,तसेच कलम ६ ब शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे.या कायद्याची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे. ३१ मे जागतिक तंबाखू नकार दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये व शाळा याठिकाणी जिल्हा आरोग्य विभाग व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने धुम्रपान निषेधक्षेत्र असे फलक लावण्याची मोहिम राबविण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मंगेश गायकवाड यांची उपस्थिती होती.
0 Response to "सर्व शासकीय कार्यालये व शाळा तंबाखू मुक्त करा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे"
Post a Comment