वाशीम शहर येथील गाडी चोरीचे बाबत
साप्ताहिक सागर आदित्य
वाशीम शहर येथील गाडी चोरीचे बाबत तपास करत असताना एक गाडी चोरीचे ठिकाणा वरील CCTV फुटेज मध्ये वाशीम येथील इसम शिवा जाधव हा संशयित रित्या हालचाल करताना दिसून आला त्यास चौकशी कामी ताब्यात घेतले असता गाडी चोरी बाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली त्यावेळी त्याने वाशीम शहर येथील 03 व शिरपूर येथील 01 गाडी चोरी केल्याची कबुली दिली नमूद चोरी त्याने त्याचा चुलत भाऊ सोनू जाधव, रा.देवठाण, वाशीम याचे मदतीने केल्याचे सांगितले असता त्यालाही ताब्यात घेतले व दोघांकडून 04 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
नमुद पैकी शिरपूर येथे गु र क्र 237/24 कलम 379 IPC हा दाखल असून त्याबाबत शिरपूर पोलीस ठानेस माहिती देण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पुजारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांचे सूचनांप्रमाणे वाशीम शहर DB पथक अधिकारी पोउपनी निलेश जाधव व पो.ह ठाकूर, पो ह वाढणकर, पो शी देशमुख, पो शी दुतोंडे, पो शी कोरडे, पो शी बोडखे, पो शी इरतकर यांनी केली
0 Response to "वाशीम शहर येथील गाडी चोरीचे बाबत "
Post a Comment